सुस्ते – श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत जनजागरण फेरी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रबोधन प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य अविनाश कटकधोंड यांनी या अभियानाचे महत्व,शासनाचे हेतू व आपले कर्तव्य विद्यार्थ्यांना सांगून मार्गदर्शन केले.प्रथमेश गावडे यांनी या अभियानासंदर्भात माहिती सांगितली. कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना विविध रासायनिक घटकांपासून बनवलेल्या फटाक्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी,वायू व ध्वनी प्रदूषण तसेच अग्नि अपघात सांगून फटाकेमुक्त,प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व सामूहिक शपथ दिली. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांच्या फेरीचे स्वागत व प्राचार्य कटकधोंड यांचा सन्मान सरपंच विशाल कसबे, ग्रा.स.दत्तात्रय बोबडे,दिलीप चव्हाण,रामभाऊ चव्हाण, दत्तात्रय चव्हाण,रमेश रोकडे,भैय्या फडतरे,मतीन शेख,पोपट चव्हाण, भागवत वाघमारे व प्रतिष्ठित ग्रामस्थांनी केले आणि ग्रामस्थांतर्फे सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.प्रशालेत पोहोचल्यावर सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून गुळ शेंगदाणा लाडू व खिचडी देऊन अतिशय उत्स्फूर्त वातावरणात प्रबोधन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी पर्यवेक्षक सुरेश कट्टे, जेष्ठ लिपिक राजकुमार ढगे, शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे, शिक्षकेतर प्रतिनिधी नागनाथ मैंदर्गी, ज्युनिअरचे राजाराम घोडके, जेष्ठ शिक्षक राजेंद्र जाधव,जैनुद्दीन शेख, महेश देशमुख, देवदत्त वाघ, वैशाली म्हेत्रे व प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होते.

















