भारताच्या परिवर्तनकारी अमृत काळाच्या युगात, भारतीय रेल्वे एका महत्त्वाकांक्षी समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी समर्पित आहे. लाखो दैनंदिन अभ्यागत आणि प्रवासी सुविधा वाढवण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वेने मुख्य प्रवासी स्थाने आणि स्थानकांच्या चौकांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे (पीएमबीजेकेस) स्थापन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोरण आखलेले आहे.
या उपक्रमाची प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे दर्जेदार औषधे आणि उपभोग्य वस्तू (जनऔषधी उत्पादने) सर्वांना परवडणा-या दरात उपलब्ध करून देण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाला चालना देणे तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवासी आणि अभ्यागतांसाठी जनऔषधी उत्पादने सहज उपलब्ध करून देणे, संपूर्ण समाजात आरोग्य आणि कल्याण योजनेचा प्रसार वाढवणे. यातून प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडून उद्योजकांसाठी रोजगाराच्या संधी आणि नवे मार्ग निर्माण होतील.
या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र ही ‘इच्छित प्रवासी सुविधा’ मानली जाईल, ज्यात रेल्वेने परवानाधारकांद्वारे कार्यान्वित करण्यासाठी परिभ्रमण क्षेत्रांमध्ये दुकाने तथा स्थानकांचे संकुल प्रदान केले जाईल. सुरुवातीच्या टप्प्याचा भाग म्हणून, भारतीय रेल्वेने पायलट प्रोजेक्टसाठी देशभरात ५० स्थानके निवडली असून, ज्यात मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या ४ स्थानकांचा समावेश आहे.
पथदर्शी प्रकल्पासाठी मध्य रेल्वे अंतर्गत स्थानके आहेत:
१. मुंबई विभागाचे लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानक
२. भुसावळ विभागाचे मनमाड स्थानक
३. पुणे विभागाचे पिंपरी स्थानक
४. सोलापूर विभागातील सोलापूर स्थानक
या ४ स्थानकांवर प्रधानमंत्री जन औषधी केंद्र स्थापन करण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया ई-लिलावाद्वारे ३ वर्षांच्या काळासाठी यशस्वीरित्या उपलब्ध केली आहेत. हा उपक्रम दर्जेदार औषधे आणि जीवनावश्यक उपभोग्य वस्तू प्रवाशांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी हातभार लावण्यासाठी तत्पर आहे.
मध्य रेल्वेचा असा विश्वास आहे की प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या स्थापनेमुळे प्रवाशांच्या आरोग्यविषयक गरजा तर पूर्ण होतीलच शिवाय रेल्वे स्थानकांच्या परिसरात व्यक्तींसाठी रोजगाराच्या नव्या संधी आणि उद्योजकीय मार्गही निर्माण होतील. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या सर्वांसाठी आरोग्यदायी आणि अधिक समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.