Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड : मुनगंटीवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 25, 2024
in maharashtra
0
वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड : मुनगंटीवार
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहेत. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्रप्रकल्पांच्या सोईसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे “वनामृत” हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही मुनगंटीवार यांनी जाहिर केला.

राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता यांच्यासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, आणि नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, पाचही व्याघ्र प्रकल्पाचा पाच वर्षासाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल का, याचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्याठिकाणी राहील, हे पाहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, सेल्फी पॉईंटसची निर्मिती करावी. तेथील परिसरातील गावातील घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवून अधिकाधिक वातावरणनिर्मिती करावी. स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, येथील महिला-युवक यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल, यासाठी प्रयत्न करणे, व्याघ्र प्रकल्पाद्वारे निर्मित वस्तू्ंचे योग्य ब्रॅंडींग होईल, त्यामध्ये एकसमानता असेल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

या प्रकल्पातील बांबू झाडांच्या फुलोऱ्याचे व्यवस्थापन करणे, बीज साठवण, अग्नी संरक्षण या बाबींकडे अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने त्यांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्युआर कोड तयार करावा. ज्याठिकाणी नदी, तलाव आहेत, तेथे हाऊसबोट सारखी संकल्पना राबवावी.

पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पात वंदे मातरम वनसेवा केंद्र सुरु करण्यात यावे. ज्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळते, त्याप्रमाणे वन विभागाच्या योजनांची माहिती आणि सेवा या केंद्रातून सुरु करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. विविध व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. ते त्याच प्रकल्पापुरते मर्यादीत न राहता त्याची अंमलबजावणी इतरही प्रकल्पात करण्यात यावी, यासाठी एक समिती नेमून त्याआधारे अभ्यास करुन एका महिन्यात त्यासंबंधी कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सध्या सर्व व्याघ्र प्रकल्पांना त्यांच्या कामाबद्दल केंद्रीय यंत्रणेने अधिक चांगला शेरा दिला आहे. हा शेरा कायम उत्कृष्ट राहील, यासाठी सर्वांनी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंची आता वनामृत या एकाच ब्रॅण्डनेमद्वारे प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. विविध व्याघ्र प्रकल्पात वस्तू / उत्पादन निर्मित होत असले तरी ते जगभर एकाच नावाने ओळखले जावे, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केली. यावेळी व्याघ्र प्रकल्पांच्या सर्व क्षेत्रसंचालकांनी सादरीकरण करुन त्याठिकाणी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Post Views: 73
Previous Post

मध्य रेल्वे ४ स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र स्थापन करणार

Next Post

राज्यघटनेची मूळ प्रत मुलांना बघायला मिळू शकत नाही, याची खंत – उपराष्ट्रपती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यघटनेची मूळ प्रत मुलांना बघायला मिळू शकत नाही, याची खंत – उपराष्ट्रपती

राज्यघटनेची मूळ प्रत मुलांना बघायला मिळू शकत नाही, याची खंत - उपराष्ट्रपती

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962067

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!