परतुर प्रतिनिधी
प्रल्हादपूर (परतूर) या ठिकाणाहून गोदावरी पात्रातील पवित्र जल पाई चालत आणून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे उड्डाणपूल याठीकानाहून सकल हिंदू बांधव-भगिनी आयोजित पहिल्या भव्य कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली कावड यात्रेचे मुख्य आकर्षण वजनदार दोन कावड ठरले भगवान शंकर यांच्या मंगल धूनसह कावड यात्रा मार्गस्थ झाली जागोजागी यात्रेकरुसाठी भक्तांनी फराळ,चहा,फळ,पाण्याची मोठी व्यवस्था केली होती
वाटूर फाटा येथे यात्रा आली असता जे.सी.बी मधून पुष्पवर्षा करण्यात आली त्यासह आतिषबाजीने जल्लोषात कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले एक दिवसीय पाई यात्रेत माताभगिनी युवा व समस्त हिंदूंची मोठ्या प्रमाणात संख्या होती दुपारी ३ वाजता शंभू महादेव मंदिर येथील श्री महादेव पिंडीला अभिषेक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
तसेच अमितजी पंडितराव देशमुख रांजणी सध्या वास्तव्य जालना यांनी संपूर्ण कावड यात्रेकरुसाठी महाप्रसाद महापंगत दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त प्रल्हादपुरकर(परतूर) यांच्या सह आयोजन समिती अहोरात्र झटली आपला उत्साह असाच राहो झालेली पहिली सुरुवात ही अखंडपणे चालू राहील याची ग्वाही समस्त आयोजन समितीने दिली सर्व हिंदू समाजाचे अभिनंदन करण्यात आले