पिलीव – राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी युवा पत्रकार प्रमोद भैस यांची फेर निवड केली असून 6 जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे ,पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी दिली आहे .
माळशिरस तालुक्यातील तळागाळातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त नागरिकांचे प्रश्न प्रशासन दरबारात त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत. युवा पत्रकार प्रमोद भैस यांनी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडली आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या आंदोलन उपोषण निवेदनात त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने या वर्षी देखील युवा पत्रकार प्रमोद भैस यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















