अक्कलकोट – जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समिती माजी सभापती स्वाती शटगार यांचे पुत्र प्रवीण शटगार सह अनेक शिवसैनिक आज आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या घटनेमुळे सलगर गटात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सलगर जिल्हा परिषद मतदार संघात प्रवीण शटगार यांचा प्रभावी नेतृत्व आहे.सलगर परिसरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या घटनेमुळे सलगर गटात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.यावेळी प्रवेश करणारे तम्मा धसाडे,रफीक पटेल,मल्लु पराणे,प्रशांत काळे,रत्नाकर पाटील,शशी शटगार आदी कार्यकर्त्यांना प्रवेश केला आहे.























