मंगळवेढा – शहरातील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सगळ्यात कमी वयाच्या नगरसेविका म्हणूनप्रभाग क्रमांक पाच ब मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रीती तेजस सूर्यवंशी या विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक पाच मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून प्रीती सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात संध्या सतीश कोंडुभैरी या महायुतीकडून उमेदवार होत्या प्रीती सूर्यवंशी या मंगळवेढा नगरपरिषदेतसी एल टी सी अभियंते तेजस सूर्यवंशी यांच्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक पाच मधील फुगारे गल्ली येथील रहिवासी असलेल्या प्रीती सूर्यवंशी यांचे वय 22 वर्षे पाच महिने असून त्या सूर्यवंशी कुटुंबातील असून इंगळे तानगावडे नागणे फुगारेअसा गोतावळा असल्याने त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात होती.
याशिवाय सुतार गल्ली ढगे जावळे डोरले थिटे पवार यांच्याशी असलेले दृढ संबंधप्रत्येकाच्या अडीअडचणीवर सातत्याने धावून जाणे यासह प्रभागातील किल्ला भागातील नेते अरुण किल्लेदार सह त्या भागातील अनेकांनी या उमेदवारीचे समर्थन केले होते याशिवाय श्रद्धा सबुरी पतसंस्थेचे चेअरमन राजाराम सूर्यवंशी हे या प्रभागातील अनुभवी राजकीय पदाधिकारी आहेत त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष पदावर काम केले होते 2004 मध्ये राजाराम सूर्यवंशी यांच्या पत्नी संध्या सूर्यवंशी यांनी नगरपालिका निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता.
प्रभागातील सर्व लोकांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध तसेच मितभाषी स्वभाव व तेजस सूर्यवंशी यांचे व्यक्तिगत संपर्क याच्या जोरावरप्रीती सूर्यवंशी या नगरसेवक पदी विराजमान झाल्या आहेत


























