बा-हाळी – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थान नानिजच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमा अंतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दि.24 फेब्रुवारी रोजी बा-हाळी येथील पादुका दर्शन सोहळ्याच्या तयारी वेग आलेला असून मैदानाची पाहणी करण्यासाठी संस्थानच्या अधिकारी पदाधिकारी यांनी बा-हाळीस भेट दिली .
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नानिज च्या वतीने देशासह राज्यात विविध सामाजिक, आरोग्य विषयक ,पर्यावरण ,धार्मिक, अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात अंधश्रद्धा निर्मूलन या उपक्रमा अंतर्गत नांदेड द. बा-हाळी ता. मुखेड येथे दि 24 फेब्रुवारी रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने भवानी पेट्रोल पंप ,उदगीर हाळणी रोड शेजारी उमाटे पाटील यांच्या शेतात सदर कार्यक्रम होणार आहे यास नांदेड जिल्ह्यसह लातूर जिल्ह्यातील उदगीर ,जळकोट तालुक्यातून 25 ते 30 हजार भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यक्रमाच्या संदर्भात तयारीस वेग आलेला असून मैदान स्वच्छ करण्यास बा-हाळी, सकनूर ,वडगाव येथील महिला व तरुण वर्ग पुढाकार घेत आहेत .मैदानाची तयारी व पुढील नियोजनासाठी प्रोटोकॉल अधिकारी राघव चव्हाण तेलंगणा उपपीठ प्रमुख तथा नांदेड द. जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे,ग़गाराम मारेपल्ली, जिल्हा अध्यक्ष श्याम नागलगावे,अशोक चरकूलवार ,राम माचीनवार तालुका अध्यक्ष मारुती इबितवार, शंकर नकाते,बालाजी सोमावार,व्यंकट पा.उमाटे,हनमंत मामा वाडीकर,साईनाथ दाचावार, दिलीप महाजन,साईनाथ कोटगीरे, प्रा.डॉ. निखिल चव्हाण, उत्तम वाडीकर,बालाजी जाधव,शिवाजी गवते,राम,चव्हाण अम्रत पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते






















