पुणे – भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व पतित पावन संघटना,श्रीराम नवमी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली निमित्त “किल्ले बनवा स्पर्धा २०२५” चा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार पेठ येथील मोतीबाग कार्यालयात संपन्न झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर,शाहीर हेमंतराजे मावळे,पतित पावन संघटनेचे संस्थापक सदस्य शिवाजीराव चव्हाण,विश्व हिंदू परिषद चे प्रांत मंञी किशोर चव्हाण व भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त बाजीराव मणेरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे 👇🏻
वैयक्तिक गट
• प्रथम क्रमांक- वेद नकुल इनामदार रोख रक्कम रुपये पाच हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• द्वितीय क्रमांक – रूपेश आदमाणे रोख रुपये तीन हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• तृतीय क्रमांक- सुमेध निलेश गुजर रोख रुपये दोन हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• उत्तेजनार्थ – अनिश काची सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
सांघिक गट
• प्रथम क्रमांक- गावकोस दत्त प्रतिष्ठान रोख रुपये पाच हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• द्वितीय क्रमांक- महाराज ग्रूप रोख रुपये तीन हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
• तृतीय क्रमांक- प्रल्हाद सायं शाखा रोख रक्कम रुपये दोन हजार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• उत्तेजनार्थ – शिवशंभो प्रतिष्ठान
सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्याचे संस्थेचे दुसरे वर्ष आहे.या स्पर्धेत एकूण ९५ स्पर्धक होते.६५ वैयक्तिक व तीस सांघिक असे.
व प्रोत्साहन पर ५७ जणांना पारितोषिके देण्यात आली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
ऋतुराज बलकवडे,अथर्व साळुंखे,कृष्णा भल्ला व वेदांत दंडूले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन किरण गांधी यांनी केले.प्रास्ताविक उदय पंचपोर यांनी केले.योगेश खाटपे यांनी स्पर्धकांची नावे घोषित केली.आभार प्रदर्शन पतित पावन संघटना,श्रीराम नवमी उत्सव समितीचे विश्वास मणेरे यांनी केले.
अधिक माहितीसाठी
उदय पंचपोर
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था
9892593720
………………
भारतीय संस्कृती संवर्धक संस्था, पतित पावन संघटना व श्रीराम नवमी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले बनवा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर,शाहीर हेमंत राजे मावळे,किशोर चव्हाण,बाजीराव माणेरे.
स्थान – मोतीबाग,शनिवार पेठ
२२ नोव्हेंबर २५.

















