ग्रंथाली – प्रतिभांगण आणि ओंकार नाट्यमंदिर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानधारा’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक- हिंगुलांबिका प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक- स.ही.ने. प्रशाला, तृतीय क्रमांक- इनोव्हेटिव्ह स्कूल अंकोली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेटफळ या शाळांनी यश प्राप्त केले. या शाळेतील बालकलाकारांचा सत्कार सोहळा साखरपेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री विजय पुकाळे, प्रमुख पाहुणे म्हणून डॅा.दिनेश रसाळ (भूलतज्ञ), श्री विकास सुरवसे (अध्यक्ष-ओंकार नाट्यमंदिर), श्री अभिषेक देशपांडे, धनंजय गोडबोले (परिक्षक), श्री उमेश बटाणे (परिक्षक), श्री अमोल राजमाने (नाट्यकलाकार), डॅा. राहूल हंचाटे (वैद्यकीय अधिकारी) उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते बालकलाकारांचे सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक श्री प्रमोद हंचाटे यांनी सत्कार करून आभार मानले.

























