वळसंग – पंचायत समिती दक्षिण सोलापूर व श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वळसंग यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री शंकरलिंग प्रशालेत दिनांक २६ व २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे समारोप बक्षीस वितरण सोहळ्याने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक विश्वनाथ थळंगे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्रीम. जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, वळसंग केंद्राचे केंद्र प्रमुख इंद्रजीत पवार,संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी,तज्ञ संचालक शिवशरण प्याटी,पंडिताराध्य हिरेमठ यांच्यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले . याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ .ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रस्तावनाद्वारे प्राचार्य विरेश थळंगे यांनी सदर तालुकास्तरीय प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेतर्फे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले. या प्रदर्शनात प्राथमिक गटातून ८६ वैज्ञानिक उपकरणे , माध्यमिक गटातून ६२ वैज्ञानिक उपकरणे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे ६ उपकरणे तर प्रयोगशाळा सहाय्यक मधून एक उपकरण मांडण्यात आले होते.
गावातील व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रदर्शनचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.परीक्षक म्हणून विश्वनाथ चव्हाण, सुशांत गद्दी, अप्पासाहेब राऊत व डॉ.जीवराज कस्तुरे यांनी काम पाहिले.प्राथमिक गटात ग्लोबल पब्लिक स्कूल बोरामणी मधील कुमार पोतदार श्रेयश ईरण्णा याच्या ऑटोमॅटिक स्कूल बेल या उपकणास प्रथम क्रमांक, कुमारी समीक्षा अर्जुन कुसुरे जीवन विकास प्रशाला भंडारकवठे हिच्या आरोग्य व स्वच्छता या उपकरणास द्वितीय क्रमांक तर कुमार बसवराज रविकांत तोळणुरे श्री भगवती गौरीमाता प्रशाला धोञी याच्या सौर कृषी पंप या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला आहे .
माध्यमिक गटातून कुमारी दीक्षा लक्ष्मण घाडगे न्यू इंग्लिश स्कूल कुसुर च्या क्लीन हॅबिट ऑन व्हील्स मोबाईल टॉयलेट व्हॅन फाऍर किड्स या उपकरणास प्रथम क्रमांक ,कुमारी तेजस्विनी बसवराज ख्याडे श्री शंकरलिंग प्रशाला वळसंग हिच्या बनाना फायबर फ्रॉम पील या उपकरणास द्वितीय क्रमांक तर कुमारी अर्पिता कृष्णात साळुंखे एस व्ही सी एस प्रशाला बोरामणी हिच्या पेपर टूथ पेस्ट या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला आहे . प्राथमिक शिक्षकांमधून अब्दुल कादर इसाक शेख न्यू इंग्लिश स्कूल कुसुर यांच्या ओ एम आर सिस्टीम वेब ॲप या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
माध्यमिक गटातून अबुबकर मुस्ताकपाशी पाटील कादरी प्रशाला औज मंद्रूप यांच्या क्यू आर कोड या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला आहे तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून विनोद मोहन दुधगी श्री शंकरलिंग प्रशाला, वळसंग यांच्या गणितीय साहित्य या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून श्रेयश ज्ञानेश्वर गुंड, साईगंधा तानाजी जमादार यांनी, शिक्षकांमधून ओम चौधरी व अब्दुल कादर शेख यांनी तर पालकांमधून शिवरुद्र तुळजप्पा बगले टाकळी यांनी आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त करून नियोजनाचे कौतुक केले .
सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सिदधाराम भैरामडगी, बाळकृष्ण गुंड, निलकंठ कवटगी,प्रा.संतोष शिंदे,सिद्धारूढ हिरेमठ, गंगाधर बिराजदार, विजय प्याटी,मल्लिनाथ गौडगाव, अजय माणकोजी,प्रा.शरणय्या मसुत़ी,विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ,गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे,प्रा.प्रतिभा तांडुरे लिपिका राजश्री दुधगी, लिपिक गौरीशंकर चनशेट्टी,कर्मचारी विनोद दुथगी व सुनिता कुर्ले यांचे सहकार्य लाभलेआहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार यांनी तर आभारप्रदर्शन संजयकुमार धनशेट्टी यांनी केले.


























