सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेसाठी संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे, मकरंद पाटील, तेजस कुरकुटे, रवींद्र कुलकर्णी, मुकुंद हजारे, शारीक तांबोळी, मयूर ढोले, विठ्ठलपंत शिंदे, अनिल तारळकर, मंगेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पालक तसेच शिवप्रेमी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस कुरकुटे यांनी तर आभार रवींद्र कुलकर्णी यांनी मानले.
विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे-
समर्थ काळे, कुंभार गल्ली-प्रथम, स्वयंम गाडे, श्रीराम ग्रुप- द्वितीय, अष्टविनायक मित्रमंडळ, पुजारवाडी-तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ शंभू गोडसे, शिवशक्ती ग्रुप-कुंभार गल्ली, विराज पाटील-कडलास, चिन्मय कुलकर्णी-अष्टविनायक ग्रुप, राजवीर वाघ-कुंभार गल्ली, राजवर्धन शिंदे, अक्षय कुलकर्णी, देवराज पोळ सरंजामदार, आर्यन यादव

















