सांगोला – सांगोला शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे भव्य तालुकास्तरीय किल्ले स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शहीद दिन दि.२६ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयात दु.३ वा. संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम पुणे येथील सहा.पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, सांगोला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अस्लम सय्यद, कवठेमहांकाळ येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल शिवशरण यांच्या हस्ते व मुंबई येथील विनोबा भावे नगरचे पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.


















