पंढरपूर – येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त घेतलेल्या किल्ला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पांडुरंग भवन येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षय बडवे पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या होत्या. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. हा कार्यक्रम एस. के. एन. कॉलेजचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर पटवर्धन, तसेच श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध बडवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ.करांडे आपल्या भाषणात म्हणाले की, कलासाधनाचा हा नवीन उपक्रम म्हणजे शिवरायांच्या विचारधारांचा खरा दीपोत्सव साजरा झाला असेच म्हणावे लागेल. तसेच शिवजयंती साजरी करतांना सामाजिक सेवा करणा-या सेवाभावी संस्थांना मदत व भेटी देऊन तिथे साजरी करावी. भविष्यात अशा सर्व उपक्रमाला जास्तीत मदत माझ्या कडून मिळेल.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर पटवर्धन आपल्या भाषणात म्हणाले की शिवरायांचा वापर फक्त निवडणुकी पुरताच राजकारण करण्यासाठी केला जातो. पण असे न करता किल्ला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध माध्यमातून महाराजांचे विचार बाल मनापासून खोलवर रुजले पाहिजेत. तसेच मोबाईल म्हणजे आफुची गोळी झाली आहे, तिचा वापर कमी होण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. शिवरायांनी किल्लेबांधताना हिरोजी इंदलकर या स्थापत्य अभियंत्याने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली होती, हे सांगताना किल्ला बांधताना जागेची निवड महाराज अगदी मायक्रोमॅनेजमेंटचा विचार करुन करीत असत. कलासाधना संस्थेला भविष्यात सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे त्यांनी विषद केले.
सदर किल्ला स्पर्धेचे परिक्षण इतिहास अभ्यासक तुकाराम चिंचणीकर, एडव्होकेट आशुतोष अनिलराव बडवे पाटील, इंटेरियम डेकोरेटर अभियंता सुमेर काळे, कलाशिक्षक प्रद्युम्न कमठाणकर यांनी समर्थपणे केले. त्याबद्दल स्पर्धेचे सचिव ज्ञानेश्वर मोरे यांच्या हस्ते परिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वेळी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन व डॉक्टर बसवराज सुतार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शिवरायांची अश्वारूढ प्रतिमा देउन करण्यात आला. परिक्षक एडव्होकेट आशुतोष बडवे यांनी किल्ला स्पर्धेचे परिक्षण कसे केले जाते हे अतिशय लालीत्यपूर्ण ओघवत्या भाषा शैलीत विषद केले. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे श्रीकांत बडवे महाजन यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सदस्य रणजीत पवार यांनी करुन दिला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अमरसिंह चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या मागील व भविष्यातील कार्याचा धावता आढावा घेतला.सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत खजिनदार राजेंद्र माळी यांनी केले. यावेळी यास्पर्धेला प्रायोजकत्व दिलेल्या स्कॉलर मार्केटिंगचे प्रमुख महेश मोहीकर व एस के एन संस्थेच्या पदाधिका-यांचा यथोचित सत्कार संस्थेचे सदस्य प्रा.मंदार परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक विभाहून कु.श्रेया माऊली डांगे व रेणुकामाता मंडळ, द्वितीय क्रमांक विभागून श्रेयश शिंगाडे व साजरा राऊत, तर तृतीय क्रमांक विभागून चिन्मय देशपांडे,वेदांग बोर्खेडकर व सोहमपेटकर यांनी प्राप्त केला तर खुल्या गटात प्रथम क्रमांक विभागून वरद विवेक बडवे व संकल्प प्रतिष्ठान, द्वितीय क्रमांक विभागून कु. अमोल वाखारकर व ओम जाधव, तृतीय क्रमांक स्वराज्य मावळे गृप अंश व आर्य कोठाडिया आणि शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी प्राप्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन, प्रा.विनायक परिचारक सर, , अभिराज बडवे, अमृतभाई पेनूरकर, प्रा. राजेंद्र मोरे ,राजेश अंबिके, ज्ञानेश मोरे, डॉ.किरण बहिरवाडे, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, शिवाजी यादव, नारायण बडवे, बसवराज बिराजदार, राजकुमार आटकळे, महेश अंबिके, राजकुमार शहा आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंदाकिनी देशपांडे यांनी केले तर आभार अरिहंत भाई कोठाडिया यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील अनेक नागरीक पालक, स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते.



















