सोलापूर – रोटरी क्लब सोलापूर आयोजित खुल्या टेबल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोलापूर लॉन टेनिस संघटनेचे सचिव व ऑलम्पिक संघटनेचे सदस्य राजीव देसाई आणि सोलापूरची कन्या व भारतीय महिला अंध क्रिकेट विश्वविजेता संघाची उप कर्णधार गंगा कदम यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर, सचिव निलेश पोफलिया, सुनील मदन, झेड एम पुणेकर आदी उपस्थित होते.
—
विजयी व उपविजयी खेळाडू :
12 वर्षे मुली – शिवानी सानप, आरोही पातेड. मुले – वीरेन माळवे अक्षित ऐनापुरे.
17 मुली-वेदांकिता पाटील, अनुष्का रावत. मुले-राजवर्धन तिवारी. औधूत चौधरी.
महिला -अनुष्का रावत, वेदांकिता पाटील पुरुष- विनोद मगजी, श्रीकांत असावा.

















