बार्शी – दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला,बार्शी या दोन्ही शाळेच्या विद्यमाने दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे छ.क्रि.शि. व समाजसेवी संस्था, उपळाई(ठों) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेत घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा व बौद्धिक स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बालाजी नाटके, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती बार्शी व प्रमुख पाहुणे म्हणून न.पा. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री.भारत बावकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (अण्णा) ठोंगे, सोपल प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन काळे यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके यांनी शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमाचे तसेच उपक्रमशील शिक्षक कुंभारे व कवी युवराज जगताप, तंत्रस्नेही मंगेश मोरे यांचेही मनापासून कौतुक करुन सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला व प्राविण्य प्राप्त मुलांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण अंगी बनावे, शालेय शिक्षणाबरोबर इतरही बाबींमध्ये अग्रेसर असावे यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते इयता १ ते १० वी वर्गातील प्राविण्य प्राप्त मुलांना प्रमाणपत्र व मेडल देऊन बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष ठोंबरे व मंगेश मोरे यांनी केले. आभार चंद्रकांत लोखंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन काळे (मुख्या), श्रीकांत कुंभारे (मुख्या), चंद्रकांत लोखंडे, युवराजजगताप, सुनिल लंगोटे, मंगेश मोरे, .राहुल ठोंगे, संतोष ठोंबरे, श्रीमती संगीता काळे अरुणा मठपती सौ.शितल पाटील ,सौ. ललिता चव्हाण,कु.प्रेरणा कसबे,श्री.संदीप भोरे श्री.श्रीकांत चव्हाण(सेवक)या सर्व शिक्षक बंधू भगिनी व सेवक यांचे सहकार्य लाभले.
















