वैराग – श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट ,कबड्डी , ४x१००मी रिले, बुद्धिबळ, गोळा फेक,१०० मी रनिंग यासारख्या मैदानी खेळांसाठी आयटीआयच्या विविध ट्रेड मधून ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, सर्व निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
आज संविधान दिनाचे औचित्य साधून या स्पर्धांच्या विजेत्यांना श्री साई चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्षा डॉ मीरा सूर्यवंशी आणि साई आयटीआयचे प्राचार्य श्याम गोवर्धन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघराज गायकवाड यांनी केले.अहवाल वाचन प्रसाद पोळ यांनी तर सूत्र संचालन संभाजी जाधव यांनी केले.



















