Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in marathwada, solapur
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कळंब / धाराशिव – परम पूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा दिनांक ६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी ज. न. म. संस्थान, उपपीठ मराठवाडा श्रीक्षेत्र माऊली माहेर सिमूरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा उत्साहात पार पडला.

सर्वप्रथम रामानंदाचार्यजींचे यजमानाच्या हस्ते शोडशोपचार पाद्यपूजन व सुवासिनींकडून औक्षण करण्यात आले. प. पू. रामानंदाचार्यजी यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी असे सांगितले की, परब्रह्म हा निर्गुण आहे, त्याला जाणण्यासाठी ज्ञानचक्षू जागृत करावे लागते. अध्यात्मात उतरल्यावर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे टप्पे कसे अनुभवास येतात हे त्यांनी साध्या शब्दांत समजावले.

सिद्ध अवस्था मिळाल्यावर “तत्व मसी, अहं ब्रह्मास्मि” या वेदवचनाचा खरा बोध होतो, ते पुढे म्हणाले की मनुष्यजन्म हा अपार्थिव संधी आहे. आपण का आलो, हा जन्म काय सांगतो हे शोधणं गरजेचं आहे. पशू जन्माला येतात आणि जगतात, पण मनुष्यजन्म कर्मयोनी असल्याने येथेच कर्म करून परमार्थ आणि उन्नती शक्य होते.
तुकडोजी महाराजांच्या वचनांचा दाखला देत रामानंदाचार्यजी म्हणाले, संसारही सांभाळा आणि भक्तीही करा.

“संसार करून परमार्थ करावा” ही संतांची शिकवण आजही तितकीच खरी आहे.
जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ सांगताना रामानंदाचार्यजी म्हणाले— “जन्माचे जे मूळ पाहिले शोधून | दुःखाची कारण जन्म घ्यावा |रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी | याच गुणी जगी वाया गेला ||” या अभंगातून तुकोबारायांनी मनुष्यजन्माचा हेतू स्पष्ट केला आहे.
भाविकांच्या समस्या ऐकून रामानंदाचार्यजी म्हणाले की दुःख येणं नैसर्गिक आहे, पण अनियोजन ही मोठी समस्या आहे. आपण आयुष्यात नियोजन नाही करत, म्हणून त्रास वाढतो. “मी तुम्हाला फक्त चॉकलेट देतो, समस्या तुम्हीच सोडवता”—असं त्यांनी विनोदी शैलीत सांगितलं.

समस्या निवारणासाठी रामानंदाचार्यजींनी सुचवले की दररोज दहा मिनिटे भक्ती करणे हा मनाचा व्यायाम आहे. मन शुद्ध झाल्यावरच भक्तीची खरी अनुभूती मिळते. नामदेवांच्या ओवीचा दाखला देत—
“जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन |
भगवंत जाणं त्याच्या जवळी ||”
भक्तीमुळे एकाग्रता, संयम आणि योग्य नियोजन क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
भाविकांना मार्गदर्शन करताना रामानंदाचार्यजी म्हणाले की “तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा,” आणि रोज दहा मिनिटे भक्ती करण्याचे पथ्य पाळा. ते सेवा करताना कुणाची जात, धर्म, पद-प्रतिष्ठा पाहत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


संस्थेमार्फत चालणाऱ्या समाजकार्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की राज्यभर 52 ॲम्बुलन्स सेवा कार्यरत असून आजवर लाखो लोकांना व्यसनमुक्ती मिळाली आहे. तसेच रक्तदान, वृक्षारोपण, blood in need, वेद पाठशाळा यांसारखे अनेक सेवा प्रकल्प सातत्याने राबवले जात आहेत.


दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामुळे भाविकांच्या मनात भक्ती, अध्यात्म व योग्य जीवननियोजनाविषयी नवी ऊर्जा निर्माण झाली. रामानंदाचार्यजींच्या बोलीभाषेतील साध्या पण प्रभावी उपदेशामुळे भाविकांना त्यांच्या समस्यांकडे पाहण्याची नवी दिशा मिळाली.


सदर कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार. बाबुराव पाटील कोहळीकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर परभणी जिल्हा परिषद सदस्य ॲड दशरथ सरवदे हिंगोली पंचायत समिती सभापती संजय नागरे, नितीन चित्ते नगरसेवक संभाजीनगर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हा परिषद, उमाकांत भोकरे नगरसेवक हदगाव, इत्यादी मान्यवरांनी यांनी रामानंदचार्यजींचे शुभाशीर्वाद घेतले.

सदर कार्यक्रमांमध्ये ७६२ भक्तगणांनी उपासक दीक्षा व ७१८ भक्तगणांनी साधक दीक्षा घेतली. परिसरातील अनेक ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वचनांचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमांमध्ये १० ते १५ हजार भाविक भक्तगण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीठ समिती, जिल्हा समिती, तालुका समिती, सेवाकेंद्र समिती, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, युवा सेना, आश्रम सेवा समिती यांनी प्रचंड मेहनत घेतली. अशी माहिती पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी, पीठ सहप्रमुख विजय देशपांडे, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी दिली.

Post Views: 271
Previous Post

वसमत पोलीस ठाण्यात वाढदिवस सेलिब्रेशन; वर्दीतील उत्सवाच्या कायदेशीरतेवर चर्चेची चाहूल

Next Post

आसरा ते होटगी रोड वाहनांच्या लांबच लांब रांगा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आसरा ते होटगी रोड वाहनांच्या लांबच लांब रांगा

ताज्या बातम्या

रणबीर दाखल झाला नागपुरात आर आर एस एस मुख्यालयात

April 13, 2026

आता मुंबई -बंगळूरू धावणार स्लीपर वंदे भारत

April 13, 2026

धावत्या बसमध्ये मातेने दिला बाळाला जन्म पण दुर्दैव बाळाचा झाला अंत

April 13, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 13, 2026

आशाताईंना दिला अखेरचा निरोप ….

April 13, 2026

वकिलाने घातली पोलिसांशी हुज्जत

April 13, 2026

पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला …

April 13, 2026

वडील गेले अन आता जगण्याचा आधार मुलेही शेततळ्यात बुडून गेली …. आईचा टाहो

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0806859

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697