कंधार – श्री शिवाजी काॅलेजचे मराठी विभाग प्रमुख, माजी एनसीसी विभाग प्रमुख, प्रोफेसर डॉ.दिलीप सावंत यांचा सेवापूर्ती सत्कार व ‘अस्मितेच्या पाऊलवाटा’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज शनिवारी, दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी काॅलेज, कंधार येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधारचे सचिव गुरुनाथराव कुरुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.पुरुषोत्तम धोंडगे, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधारचे सहसचिव अॅड.मुक्तेश्वर धोंडगे, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधारचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवाजी काॅलेज, कंधारचे प्रभारी प्राचार्य डॉ.रमाकांत जोगदंड आदींसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.



















