सांगोला – महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमख डॉ.नवनाथ सर्जेराव शिंदे यांना ग्लोबल फौडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पुणे जिल्ह्यातील सुभाष बाबर कुल आर्ट्स कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, केडगाव येथे संपन्न झालेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
























