*प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश*
देगलूर : प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी नांदेड येथील विश्रामगृहात खा. वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष हाणमंतराव पाटील बेटबोगरेकर, आमदार मोहन हंबर्डे, काँग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार आणि देगलूरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे देगलूर शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या उपस्थिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य उत्तमकुमार कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे. विद्यार्थीदशेपासून प्रा. उत्तमकुमार कांबळे सामाजिक चळवळीत हिरेरीने सहभाग घेतला आहे. व्यापक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणिव असलेले प्रा. कांबळे काल नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी देगलूर – बिलोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात इच्छुक उमेदवाराचे अर्ज काॅंग्रेस पक्षाकडे सादर केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला एक उमेदवार म्हणून चांगला आणि विद्यार्थ्यांचा आणि जनसामान्यांचा जनाधार असलेला पर्याय मिळाला आहे. यावेळी खासदार वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष हाणमंतराव पाटील बेटबोगरेकर आणि देगलूरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे देगलूर शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी पुढील कार्यासाठी प्रा. उत्तमकुमार कांबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. उत्तमकुमार कांबळे यांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता आहे.
याप्रसंगी काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख, साहेब, विठ्ठल पावडे, प्रफुल्ल सावंत, कुमार कुर्तडीकर, डॉ. गंगाधर सोनकांबळे, मुन्ना अब्बास, डॉ. करुणा जमदाडे, सुभाष रायबोले, जयपाल कांबळे, दिपक रामपुरकर, सय्यद हबीब सर, मंगेश बेंद्रिकर, मधुकर पाटील भिसे, धम्मानंद जोंधळे, भरत पाटील मरखेलकर, रमेश शिवणीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थितीत होते. या पक्ष प्रवेशाबद्दल उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले आहे.