Wednesday, March 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गॅस दरवाढीविरोधात नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध

तरुण भारतbyतरुण भारत
March 18, 2026
in editor
0
गॅस दरवाढीविरोधात नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. 

        या पार्श्वभूमीवर, कुंभार वेस नाल्याजवळ, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘नाल्यातून गॅस काढण्याच्या’ संकल्पनेचा संदर्भ घेत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नाल्यातून गॅस तयार करण्याचा अभिनव प्रयोग करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. या प्रयोगाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवत जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसमोर हे मोदी बाबा, हे मोदी बाबा, मेरी लाज रख लो आज, नाले से गॅस निकालो आज, चाय पकोडे बनालो आज, अशी आरती केली आणि नाले का गॅस का सपना दिखाना बंद करो, गॅस सिलेंडर सस्ता करो असे म्हणत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

       या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर शहर काँग्रेस ई-ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या व जनविरोधी धोरणांमुळे देशात गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे अनेक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नाल्यातून गॅस’ या भ्रामक संकल्पनेचा पर्दाफाश करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व तुटवडा दूर करावा, अशी जोरदार मागणी केली.

         यावेळी ई-ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते म्हणाले की, “गॅस सिलेंडर बुकिंगचे दिवस वाढवून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्‌तास, दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. एकीकडे सरकार गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे सर्वत्र लागलेल्या रांगा सरकारचे अपयश उघड करत आहेत, असा आरोप केला. 

         याआंदोलनात  माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, सिद्धराम चाकोते, भारती इप्पलपल्ली, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमनताई जाधव, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, माजी नगरसेविका शोभा बोबे, संध्या काळे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, नूर अहमद नालवार, सुनील सारंगी, धीरज खंडारे, सचिन पवार, अभिषेक गायकवाड, श्रीनिवास परकीपंडला, आप्पाजी गायकवाड, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत टिक्के, हणमंतु रुपनर, मोहसीन फुलारी, जब्बार शेख, अभिलाष अच्युगटला, श्रीनिवास कोटा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 12
Previous Post

गुढीपाडवा

Next Post

आदर्श शिक्षिका पुरस्कार पल्लवी मेणकर यांना जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आदर्श शिक्षिका पुरस्कार पल्लवी मेणकर यांना जाहीर

आदर्श शिक्षिका पुरस्कार पल्लवी मेणकर यांना जाहीर

ताज्या बातम्या

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

March 18, 2026
दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

March 18, 2026
भारतीय योग संस्थानच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

भारतीय योग संस्थानच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

March 18, 2026
समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

March 18, 2026
हाजी हाशमोद्दीन तांबोळी ट्रस्टच्या वतीने ईद निमित्त किराणा कीटचे वाटप

हाजी हाशमोद्दीन तांबोळी ट्रस्टच्या वतीने ईद निमित्त किराणा कीटचे वाटप

March 18, 2026
पहिल्याच विकासकामांच्या उद्घाटनाने खा.ज्योती वाघमारे भावूक; जुन्या आठवणींना उजाळा 

पहिल्याच विकासकामांच्या उद्घाटनाने खा.ज्योती वाघमारे भावूक; जुन्या आठवणींना उजाळा 

March 18, 2026
समावेशित शिक्षणांतर्गत विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांना साहित्य-साधनांचे वितरण

समावेशित शिक्षणांतर्गत विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांना साहित्य-साधनांचे वितरण

March 18, 2026
शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

शिवशंकर बझारचा दुहेरी सन्मान; HUL व कारगिलकडून राष्ट्रीय पातळीवर गौरव

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0744393

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697