तभा वृत्तसेवा,
सोलापूर – कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन हजार शंभर रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागाच्या सोलापूर जिल्ह्यातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी त्यांचे ऊस हविनाळ येथील श्री दत्त कारखान्याकडे पाठवत आहेत. मात्र या कारखान्याकडून सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा तीनशे रुपये कमी दर देण्यात येत असल्यामुळे दक्षिण मधील शेतकऱ्यांनी या कारखाना प्रशासना विरोधात आंदोलन केला . तसेच सादेपूर बंधारा येथे असणाऱ्या विभागीय कार्यालयाला कुलूप घालून तीन हजार शंभर रुपये दर देण्याचे मागणी केली.
कर्नाटक सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति टन तीन हजार शंभर रुपये दर जाहीर केला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात अद्याप कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केला नाही , मात्र उसाचे गाळप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी कर्नाटकाच्या हद्दीतील साखर कारखान्यांना ऊस पाठवत आहेत .
मात्र या कारखान्याकडून सरकार जाहीर केलेल्या दरापेक्षा तीनशे रुपये कमी दर देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केला. त्यामुळे हविनाळ येथे पाठवण्यात आलेल्या उसाला प्रति टन तीनशे रुपये कमी दर देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेल्या सादेपूर बंधारा येथे आंदोलन करून त्यांच्या कार्यालयाला कुलूप लावले . तसेच कर्नाटक राज्यातील शेतकऱ्याप्रमाणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनाही तीन हजार शंभर रुपये दर देण्यात यावे , कोणत्याही कारखान्याला ऊसाची वाहने जाऊ देणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच संगमेश बगले पाटील,
शेतकरी संघटनेचे इक्बाल मुजावर, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक जिल्हाध्यक्ष मोहसीन पटेल, काॅंग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख, भंडारकवठेचे वसंत पाटील, तम्माराया कोळी, महादेव बिराजदार, शिवगोंडा बगले, चनगोंडा बगले, उमेश वाघमारे, सिध्दाराम मेणसंगी, चिदानंद पाटील, धरेप्पा पडनूरे आदी उपस्थित होते.
…
….
दुजाभाव न करता दर द्यावे
…
कर्नाटक सरकारने ऊसाला प्रतिटन तीन हजार शंभर रूपये दर जाहीर केल्याने दक्षिण तालुक्यातील शेतकरी कर्नाटकच्या कारखान्याला ऊस पाठवत आहेत. मात्र हविनाळ येथील कारखान्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना तीनशे रूपये कमी दर देऊन शेतकर्यांमध्ये दुजाभाव करीत आहे. त्यामुळे आम्हालाही तीन हजार शंभर रूपये दर देण्यात यावे, अन्यथा ऊस वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
संगमेश बगले पाटील, सरपंच, लवंगी, दक्षिण सोलापूर
….

























