जालना – जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेले शासकीय नर्सिंग महाविद्यालयात आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज देशमुख यांची उपस्थिती होती. या महाविद्यालयात 234 विद्यार्थी नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, इमारत परिसरात अस्तव्यस्त पडलेले साहित्य व वसतिगृहाची दुरुस्ती करावी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असे निर्देश दिले.


























