बार्शी – न्यू हायस्कूल येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाच्यावतीने प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी निर्भया पथकातील पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाटूळे आणि महिला पोकॉ नम्रता गटकुळ, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक उंबरदंड सर, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उंबरदंड सर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शीचे पोकॉ बाबासाहेब घाडगे यांनी मुलींनी संकटाच्या प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, संकटकालीन तक्रार कशी व कोठे करावी, मदतसेवा टोल फ्री क्रमांक, तसेच पोलिसांचे तत्पर कार्य, सोशल मीडिया वापराचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती याबाबत मार्गदर्शन केले.
पोकॉ हनुमंत पाडुळे यांनी मुलींना सायबर गुन्हे, ऑनलाइन सुरक्षितता, तसेच छेडछाड प्रतिबंध याविषयी माहिती दिली.
पोकॉ नम्रता गटकुळ यांनी स्वसंरक्षणाचे मूलभूत धडे, आत्मविश्वास वाढविणाऱ्या टिप्स आणि प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांसह विद्यार्थिनींना प्रेरित केले. शाळेच्या शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. विद्यार्थिनींनी निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी अधिकाऱ्यांशी संवाद साधत शंका दूर केल्या. उपस्थित पालक आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक मिलिंद ताकपिरे निर्भया पथकाचे आभार मानले आणि शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अशा उपक्रमांची मालिका सुरुच राहील, असे सांगितले. न्यू हायस्कूल, मनगिरे मळा परिसरात झालेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.



















