अक्कलकोट – तालुक्यातील चपळगाव येथील अभिजीत पाटील मित्र परिवार यांच्या वतीने नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते २०२६ चे दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.
दिनदर्शिकेमध्ये राष्ट्रीय नेते, महत्त्वाचे सण-उत्सव व सामाजिक संदेशांचा समावेश करण्यात आला आहे.भारतीय जनता पार्टी अक्कलकोट शहर कार्यालयात उत्साहात पार पडले.
यावेळी सागर दादा कल्याणशेट्टी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजामध्ये सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा व संघटन बळकट व्हावे या उद्देशाने ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत पाटील मित्र परिवारच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.


















