ठाणे : टीजेएसबी सहकारी बँकेच्या दिनदर्शिका वैशिष्ठयपूर्ण असतात. वर्षातील महत्वपूर्ण विषय, सकारात्मक घटना, विधायक उपक्रम यावर आधारित असतात. ज्ञान, माहिती आणि प्रबोधन यांच्या आधारे टीजेएसबी सहकारी बँक दरवर्षी आपली दिनदर्शिका प्रसिद्ध करत असते. मराठीसह इंग्रजी, कन्नड, गुजराथी आणि हिंदी अशा पाच भाषांतून टीजेएसबी बँकेची दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. बँकेच्या सर्व एकशेत्रेसष्ट शाखांमधून दिनदर्शिका वितरित केली जाते. दिनदर्शिका उपयुक्त आणि संग्राह्य ठरावी याला प्राधान्य देत वर्ष दोन हजार सव्वीसची दिनदर्शिका बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून दिलेल्या मान्यतेला समर्पित आहे. या दिनदर्शिकेतून सदर बारा ऐतिहासिक किल्ल्यांची सचित्र माहिती दिली आहे. या अभिनव दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. शरद गांगल, उपाध्यक्ष सीए श्री. वैभव सिंगवी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल आरेकर उपस्थित होते. तसेच, या दिनदर्शिकेचे मार्गदर्शक एजीएम श्री. प्रवीण जाधव आणि एजीएम स्नेहा फडके यावेळी उपस्थित होते. या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते श्री. चेतन पाशिलकर यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्तरेखितचित्र आहे. प्रकाशनाच्या निमित्त मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते श्री. चेतन पाशिलकर यांचा सत्कार करण्यात आला. दिनदर्शिकेतील प्रत्येक महिना युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांपैकी एका किल्ल्याला समर्पित असून, प्रत्येक किल्ल्यासोबत संक्षिप्त माहिती तसेच QR कोड देण्यात आला आहे. हा QR कोड स्कॅन केल्यावर संबंधित किल्ल्याचा इतिहास, वास्तुरचना आणि महत्त्व याबाबत सविस्तर ध्वनिमुद्रित माहिती उपलब्ध होते. या वैशिष्ट्यामुळे ही दिनदर्शिका एक संवादात्मक डिजिटल अनुभव देणारी झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून टीजेएसबी सहकारी बँक लि., छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा केवळ दृश्य स्वरूपात न ठेवता, तो अनुभवात्मक आणि प्रेरणादायीपद्धतीने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतआहे. ही दिनदर्शिका विचारांना चालना देणारी असून गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारी आहे.
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड विषयी
१९७२ साली स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक लि. ही देशातील अग्रगण्य बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांपैकी एक आहे. ठाणे येथील मुख्यालयातून कार्यरत असलेलीही बँक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पसरलेल्या १६३ शाखांद्वारे सात लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत आहे. विश्वास, नवोन्मेष आणि ग्राहक सेवा यामूल्यांच्या आधारे आधारित असलेली बँक रिटेल, कॉर्पोरेट, फॉरेक्स तसेच, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आधुनिक आणि सुलभ सेवा पुरवते. सहकाराच्या तत्वाचे जतन आणि दूरदृष्टीयातून टीजेएसबी बँक आपल्या ग्राहकांना व्यवसायिक मूल्याधारित आर्थिक समाधान देत त्यांना सशक्त करण्याच्या ध्येयाशी कटिबद्ध आहे.
























