श्रीपूर – माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामातील उत्पादीत झालेल्या १ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलासराव खुळे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी याच बरोबर विविध राज्यातील प्रशिक्षणार्थी १२ आय.ए.एस. अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी यांचा कारखान्याचे चेअरमन मा आ श्री प्रशांतराव परिचारक यांनी यथोचित सन्मान करून स्वागत केले
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी कारखान्याचा गळीत हंगाम २०२५ / २६ हा व्यवस्थित सुरु झाला असून यावेळी प्रतिदिन दहा हजार मे . टन गाळप करणार असून ऊस तोडणी वेळेकर मिळणार आहे . या हंगामान कारखान्याने १२ लाख मे. टन . ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून कारखान्याने नेहमीच शेतकरी व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली असल्याचे सांगितले .
तर कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कारखाना पहिल्या दिवसापासून विना अडथळा असून गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ झालेने १२ दिवसात कारखान्याने १ लाख १५ हजार ४८४ मे.टन गाळप केले असून १ लाख १११ साखर पोती उत्पादन झाली आहेत तर सरासरी साखर उतारा ९. ३२ % मिळाला असून आसवानी प्रकल्पामधून ८ लाख ६४ हजार २८२ लि.इथेनॉल उत्पादन झाले आहे को-जन प्रकल्पामधून ८५ . ५२ लाख युनिट विज निर्मीती झाली असून ४६ . ७० लाख युनिट वीज एक्स्पोर्ट केली असल्याचे सांगितले
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम सुदाम मोरे विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . १२ आयएआय प्रशिक्षणार्थीची कारखान्यास भेट . .
आयएएस पास झालेले विविध राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थीनी कारखानास भेट दिली . योगायोगाने आजच पांडुरंगच्या १ लाख १११ साखर पोती पुजन कार्यक्रम होता . यावेळी चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी त्यांचा सत्कार केला . तर कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कारखाना कारखान्यातील प्रकल्पांची माहिती तसेच देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखर उद्योगाची सद्द स्थितीची माहिती देवून त्यांना अवगत केले .


















