वळसंग : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा जानेवारी महिन्यात अति उत्साहात संपन्न होणार असून त्याआधी परंपरेनुसार नंदीकाठी पूजा होत आहे. ज्या गावातील नागरिकांनी आमंत्रण देतील त्यांच्या घरी सिद्धरामेश्वर यांचे नंदीकाठी पूजा करतात.
वळसंग येथील रहिवाशी राजकुमार वीरुपक्ष धनशेट्टी यांचे आमंत्रण स्वीकार करून श्री सिद्धरामेश्वर नंदिकाटी आगमन झाले होते. नंदीकाठी चे स्वागत फुलांची वर्षाव व एकदा भक्तलिंग हर बोला हर ….. श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोशात करण्यात आले. नंदीकाठी ची पूजा शंकर व धर्मपत्नीसह विधिवत प्रमाणे करण्यात आले. आलेल्या सर्व भक्त मंडळींना महाप्रसादाचा आयोजन धनशेट्टी कुटुंबाकडून केले होते.
या शुभप्रसंगी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड,मानकरी संतोषकुमार शिरशी, डॉ. संगमेश्वर निलासर,सिद्धाराम मठपती, सुनील पाटील किरण इंडे, ओंकार कुदरे, धनराज खुबा,वीरेश बागलकोटे, संतोष दुधगी, सुनील भैरामडगी, मनोज थळंगे, सुदर्शन दुधगी,बसवराज व्हनकडे,पत्रकार कल्लय्या स्वामी,बसवराज दूधगी,प्रणव तिवारी, सागर माळी,मल्लिनाथ होनमुर्गीकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
























