मंगळवेढा – सिद्धापूर गावचे ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभू श्री मातुर्लिंग गणपती यात्रेनिमित्त आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाली.
यावेऴी आमदार आवताडे यांनी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि समाधानासाठी प्रार्थना केली. यासोबतच स्वयंभू श्री मातुर्लिंग गणपतीच्या कृपेने सदैव शांतता, भक्तिभाव आणि एकतेची भावना नांदावी, हीच सदिच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, युवक नेते प्रणव परिचारक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराया चौगुले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, उपसरपंच सचिन चौगुले, सरपंच अमोगसिद्ध पुजारी, आर बी सी शिक्षण संस्थेचे संस्थापक गजानन पाटील सरआदी सहकारी तसेच भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.नवसाला पावनारा आशी या गणपतीची ओळख आसल्याने नवीन विवाह झालेली जाेडप्यांची संख्या दर्शनासाठी आधिक हाेती.नदी काेरडी आसल्याने भाविकांचे दर्शन मुक्तपने झाले,





















