पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या या हंगामातील 25005 पोत्याचे पुजन कारखान्याचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील हस्ते करण्यात आले.
ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटी ल यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील ,संचालिका रेखाताई बोञे पाटील ,यांच्या मार्गदर्शनखाली 202६ या गळीत हंगामात आधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी नियोजन केल्याने सुरूवातीपासून नवीन व जुना कारखाना पुर्ण क्षमतेने चालु असुन उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत .त्यामुळे या परिसरातील संपुर्ण ऊसाचे नियोजन बध्द गाळप केले जाईल तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला परिपक्व ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले.
या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते ,प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड, इलेक्ट्रिक विभाग प्रमुख धनाजीराव पवार, मेजर मोहन घोङके ,केन मॅनेजर शरद देवकर एच् आर मॅनेजर निलेश गुरव, ओ एस् रमेश आवताडे , ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर ,,नितीन जाधव,सर्व विभाग प्रमुख , कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
_ ओंकार साखर कारखान्यात 25005 साखर पोतयाचे पुजन करताना मान्यवर.




















