पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) आठपदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयार केला असून लवकरच तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. सध्य द्रुतगती महामार्ग हा सहापदरी आहे. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्या हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ने तयार केला आहे. सध्या महामार्ग सुमारे ९४ किलोमीटर लांबीचा आहे.या महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर आशिया खंडातील सर्वांत उंच दरी पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...