सोलापूर – महिलांच्या राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीतून आठ खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
सोम निकिता (तेलंगणा) , दुग्याला श्लोका (तेलंगाणा) , महान्या सुब्रमण्यम (तेलंगणा) , भक्ती तज्ने (नाशिक ) , ह्यद्या सिंग (पंजाब) , अपेक्षा रेड्डी (तेलंगणा) , श्रीनीती पटोजू (तेलंगणा) , गार्गी फुले (पुणे) हे मुख्य फेरीत प्रवेश केलेले ८ महिला खेळाडू आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत व अखिल भारतीय लॉन टेनीस संघटनेच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर हिच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी राजीव देसाई , प्रवीण झिटे , वनिता भोसले , पूजा सालगुडे , सुनंदा पवार , मधुरा देशपांडे , महिला खेळाडू व पालक उपस्थित होते.


























