देगलुर बांधकाम विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
करडखेड – मरखेल – हाणेगाव रस्त्याचा मलमपट्टी नंतर दोन महिन्यात खड्डे पडण्यास सुरुवात
देगलुर /प्रतिनिधी :
तालुक्यांतील करडखेड-हाणेगाव -कामाजीवाडी या रस्त्यावर देगलुर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी केले होते. परंतु, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप प्रवाशांनी व नागरिकांना मनस्ताप होत असुन भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु दर वर्षाला या रस्त्याची दुरुस्ती केले दोन महिन्यात खड्डे पडणे सुरू झाले असून देगलुर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशिर्वादाने या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य झाल्याने येथील रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देगलुर तालुक्यातील करडखेड ते हाणेगाव दळवळण्यासाठी तेलंगणा कर्नाटक आंध्रा या तीन राज्याच्या सीमेला जोडणाऱ्या या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे, त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. शासनाचे लाखो रुपये निधी मंजूर झाल्याने या रस्त्यावरील काही दिवसांपूर्वी देगलुर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तात्पुरतीची मल्लमपट्टी केली होती दर वर्षाला शासनाने या रस्त्यावर लाखो रुपये निधी दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जातो .
परंतु दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराने शासनाचे लाखे रुपये निधीचा वरचेवर मलापट्टी करून निधीची विल्हेवाट लावल्याने या रस्त्याची परिस्थिती जैशी थी वैशी राहील्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर जुन ते जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर दुरुस्ती केलेल्या स्त्यावर खड्डे पडण्यास सुरू झाल्यामुळे अपघातीची शक्यता नाकारण्यात येत नाही . जून जुलै महिन्यात पावसानंतर मलमपट्टी केलेल्या रस्त्यावर एक दोन महिन्यात खड्डे पडण्यात सुरुवात झाले असून झालेल्या मलमपट्टी रस्ता तयार करताना रस्त्याचा गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत . शासनाने दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी या रस्त्यावर लाखो रुपये निधी खर्च केला जातो .निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा करडखेड मरखेल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा रस्ता पार करताना ग्रामस्थांना मनस्ताप सहन करत पुन्हा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्क याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या सर्व रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.