सांगोला – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश सावंत, राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले, प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.
यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, धनंजय पानसांडे, संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे, सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावात पत्रकारांच संघटन बळकट करू
– सतीश सावंत, प्रदेशाध्यक्ष

























