सोलापूर – फिरादाबाद हरियाणा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत सोलापूरचे राजमहेंद्र येमुल यांनी सुवर्णपदक पटकाविले.
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज आयोजित जिल्हा बेंच प्रेस स्पर्धेत त्याचबरोबर सोलापूर जिल्हा पावर लिफ्टिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ही त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले होते.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मास्टर थ्री मध्ये 83 किलो वजन गटामध्ये त्यांनी 105 किलो वजन उचलत सुवर्णपदक प्राप्त केले. त्यांना प्रा. संतोष गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मराठा समाज सेवा मंडळचे संचालक डॉ. सुरेश पवार, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉ. मोटे यांनी अभिनंदन केले.


















