तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतरमहाविद्यालयीन क-झोन कुस्ती स्पर्धा विद्यापीठाच्या इंडोर हॉलमध्ये उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत १२ महाविद्यालयांचे एकूण ३२ कुस्तीपटू सहभागी झाले. अटीतटीच्या लढतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालयाने तीन सुवर्णपदक तर एक रौप्य पदक मिळवून सर्वसाधारण चॅम्पियनशिपचा मान पटकावला आहे.
विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये ५७ किलो वजन गट गणेश संतोष माचनवाढ सुवर्णपदक,
७४ किलो वजन गट अभिनव केशव शिंदे सुवर्णपदक,
७९ किलो वजन गट मन्मथ शिवराज मुंगडे सुवर्णपदक,
७४ किलो वजन गट अवधूत आत्माजी राहेर रौप्य पदक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे महाविद्यालयातील चारही विजेते खेळाडू सेंट्रल झोन कुस्ती स्पर्धेसाठी निवड व सराव शिबिरासाठी पात्र ठरले.
बक्षीस वितरण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. टी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, सहसचिव रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अॅड. उदय निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
खेळाडूंना क्रीडा विभागाचे डॉ. अर्जुनसिंग ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रभारी क्रीडा संचालक प्रा. प्रकाश कोथळे व डॉ. आर. एस. कोंडेकर यांनीही विशेष सहकार्य केले.