सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचालित जिजामाता प्रशाला कोंडी उत्तर सोलापूर येथे संस्थेच्या प्रेरणास्थान माजी आमदार कै. निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रेरणेने आणि संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ व सचिवा सौ शिल्पा ठोकळ व प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजामाता माँसाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आजच्या प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य सौ सुप्रियाताई शशिकांत भोसले होत्या. जिजामाते च्या भूमिकेत कु प्राजक्ता निंबाळकर होत्या थोरल्या राणीसाहेब सईबाई म्हणून स्वाती शिंदे होत्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई म्हणून कु साक्षी फंड होत्या पुतळाबाई राणी साहेब कु वैष्णवी भोसले आणि सगुणाबाई राणीसाहेब म्हणून प्राजक्ता मोरकाने होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सारंग पाटील यांनी परिश्रम घेतले.
या जन्मोत्सवास तमाम गावकरी ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने यशस्वी झाला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु दीपा निंबाळकर हिने केले तर आभार कु स्नेहल शिंदे हिने मानले.

















