सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे सोलापूर संचलित जिजामाता बालक मंदिर व जिजामाता प्राथमिक शाळा तुळशीदासनगर कोंडी येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलूसर तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या सौ सुप्रियाताई भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधवसर उपस्थित होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व हुतात्म्यांच्या स्मृतीला वंदन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ पाळणागीत, पोवाडा, नृत्य,भाषणे सादर केली.
पालक शहाजी भोसले यांच्यावतीने विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे भाषणे झाली.या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनींनी केले.बहुसंख्य मुली ह्या जिजाऊंच्या वेशभूषेत आले होते. कार्यक्रमास पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


















