बार्शी – संपूर्ण भारतात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आली. याच पार्श्वभूमीवर बार्शी शहरात गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीची सुरुवात भगवंत मैदान, बार्शी येथून होऊन संत हराळय्या समाज मंदिर, एसटी स्टँड चौक, संत रोहिदासनगर, नगरपालिका चौक, संत रोहिदास मठ, कसबा पेठ, व्हनकळस प्लॉट, अलीपुर रोड, संत ज्ञानेश्वर मठ या मार्गाने यशस्वीरित्या संपन्न झाली.
या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार व समाजात समता, बंधुता आणि एकतेचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश या रॅलीमागे होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तालुका व शहर चर्मकार समाजाच्यावतीने करण्यात आले होते.















