यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा सण हा उद्या म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणार आहे.
महाशिवरात्री 2024 शुभ मुहूर्त ?
- चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9.57 वाजता सुरू होईल. तर चतुर्दशी तिथी 9 मार्च रोजी सायंकाळी 6.17 वाजता समाप्त होईल. पूजेचा शुभ मुहूर्त 12.07 ते 12.56 पर्यंत असेल. व्रताचा पारण मुहूर्त 9 मार्चच्या सकाळी 6.37 ते दुपारी 3.28 पर्यंत असणार आहे.
- सर्वार्थ सिद्धी योग : सकाळी 06:38 पासून सुरू होणार तर सकाळी 10:41 पर्यंत चालू राहील.
- शिवयोग : 9 मार्च रोजी सूर्योदयापासून रात्री 12:46 पर्यंत राहील.
- सिद्ध योग : 9 मार्चच्या रात्री 12:46 वाजता सुरू होऊन रात्री 08:32 वाजता समाप्त होईल.
- श्रावण नक्षत्र : सकाळी 10.41 पर्यंत असणार आहे.