लोकस्वराज आंदोलन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हदगाव येथे रास्ता रोको आंदोलन निवघा बा ………..
प्रतिनिधी जिल्हाधिकारी नांदेड येथे समाजाच्या विविध मागण्यासाठी लोकस्वराज आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र भरांडे हे एक जुलैपासून उपोषणाला बसले आहे समाजाच्या विविध मागण्या अनुसूचित जाती अ ब क ड नुसार आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसले असून आज रोजी 11 जुलै नांदेड नागपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मातंग समाजाच्या वतीने व लोक स्वराज्य आंदोलन तालुक्याच्या वतीने रामचंद्र भरांडे यांना पाठिंबा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते
हदगाव तालुका संघटनेच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन हादगाव तहसीलदार व पोलीस स्टेशन हदगाव यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी लोक स्वराज्य आंदोलन तालुका अध्यक्ष दयानंद गायकवाड तालुका युवा अध्यक्ष अनिल काळे काम कामगार आघाडी मराठा संघटन संजय खानजोडे रामदास मस्के रवी भालेराव शिवदास शिरसाठ सुनील काळे राजू काळे बालासाहेब खानजोडे के.डी.पवार संतोष हातवेगळे लहुजी भालेराव राम गाडेकर आदी सामाजिक कार्यकर्ते रस्ता रोको आंदोलनास उपस्थित होते