माळशिरस – येथे आर.बी माने अग्रो सर्विसेस वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत माळशिरसच्या आर बी माने अवेंजर्स संघ अजिंक्य ठरला . आर.बी माने अग्रो सर्विसेस वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे यांच्या हस्ते करण्यात आले या चार दिवस चाललेल्या स्पर्धेत माळशिरसचा आर.बी माने अग्रो सर्विसेस संघाने प्रथम,विष्णू नारायण टायटन्स पिरळे संघाने द्वितीय नॉर्थ सोलापूर संघाने तृतीय तर हरित योद्धां संघाने चौथा क्रमांक पटकाविला ,प्रथम संघास 41 हजार,द्वितीय संघास २५ हजार,तृतीय क्रमांक संघास 15 हजार,तर चतुर्थ क्रमांक संघास 11 हजार रुपये
पारितोषिक जिल्हापरिषद सोलापूर चे मोहीम अधिकारी अजय वगरे यांच्या हस्ते व ,उप अभियंता गोविंद कर्णवर,चंदुलाल ,प्रवीण सातव,सुदर्शन कोपनर,भीमराव शेंडगे ,आबासाहेब गोरड,अभिजित वाघ,सतीश कचरे आदी मान्यवरांचे उपस्थित देऊन सन्मानित करण्यात आले.
यासंघानी सहभाग घेतला
आर बी माने अवेंजर्स,माळशिरस , विष्णू नारायण टायटन्स पिरळे, नॉर्थ सोलापूर ,हरित योद्धां ,तांदूळवाडी,टेंबूर्णी,सांगोला,मांडवे,पंढरपूर ,मोहोळ ,आदी संघांनी सहभाग घेतला
यासर्व संघाची भोजन व्यवस्था साईराज अग्रो सेलचे भीमराव शेंडगे यांनी केली .
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश शिंदे -माळशिरस,सुरज देशमुख – महाफीड,किरण काटकर-खंडाळी, अशोक (दादा)देशमुख, माळशिरस ,राहुल धनवे तोंडले,साहिल काझी अकलूज,सचिन माने माळशिरस,गणेश सोनमळे, मोरोची सागर शेंडगे माळशिरस,पांडुरंग शिंदे काका माळशिरस, उमेश देशमुख, पिलीव यांनी परिश्रम घेतले.


























