Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाचनाने मला समृद्ध बनविले – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर 

तरुण भारतbyतरुण भारत
October 16, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  सोलापूर – विविध विषयावरचे वाचन मी सतत करत गेले. माझे चुलत बंधू आणि माझ्यात वाचनाची स्पर्धा असायची..रात्र रात्र जागून आम्ही वाचायचो, त्यावर चर्चा करायचो त्यातून मी घडत गेले. खऱ्या अर्थाने मला वाचनाने समृद्ध बनवले प्रत्येकाने वाचनाची सवय अंगी बाणवावी. याकरिता प्रत्येक महिन्यातून एखादा कार्यक्रम वाचनाचा घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले. मनोगताच्या शेवटी त्यांनी गुलजार यांची ‘ किताबे ‘ ही गझल आपल्या सुमधुर आवाजात सादर केली.

    जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मोनिका सिंह ठाकुर बोलत होत्या. प्रारंभी  त्यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध ग्रंथांचे पूजन यावेळी करण्यात आले. आपल्या भाषणात त्यापुढे  म्हणाल्या की ​वाचनाच्या माध्यमातून आपण थोर व्यक्तींच्या अनुभवांचे आणि ज्ञानाचे भागीदार बनतो. त्यामुळे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, दिवसातला किमान एक तास तरी आपल्या आवडीचे, माहितीपूर्ण आणि सकारात्मक विचार देणारे पुस्तक वाचा. हेच खरे वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आहे.”

   याप्रसंगी रोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकारी आणि मराठी भाषा सदस्य  सचिव अंजली मरोड, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार सरस्वती पाटील, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

     जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य तथा सहायक कुलसचिव पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ डॉ. शिवाजी शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, आपल्या सहकाऱ्याला मदत करणे, शाळेतील मुले व तरुण वर्गाना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा डॉ. कलामांचा छंद होता. त्यामुळे कलामांच्या जीवनातून आपण सर्वांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. म्हणून वाचन संस्कृती टिकली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने नित्यनेमाने काहीतरी वाचन करावं, चिंतन, मनन करावं आणि अनुभवाची देवाणघेवाण करावी असे सांगितले.  

    उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा सचिव अंजली मरोड आपल्या भाषणात म्हणाल्या की, प्रत्येकाने आपल्या आवडीची पुस्तके वाचावीत. त्यामध्ये ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्या इतरांना सांगाव्यात. यामुळे अनुभवांची आदानप्रदान होते. त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडवून आणावा. यासाठी प्रत्येकाने काय वाचले याचे सिंहावलोकन करावे. पुढच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रत्येकाने किमान १२ पुस्तके वाचावीत असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी केले तर आभार श्रीकांत कुलकर्णी यांनी मांनले, या प्रसंगी सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती पल्लवी बागुल, महसूल सहाय्यक मुबीन कडेचुर,  मसाप जुळे सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, कोषाध्यक्ष अविनाश कामतकर, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 30
Previous Post

मुस्लिम कारागिराचे खुणावताहेत बोम्मारिल्लू… हैदराबाद, बंगलोर, मुंबई, भिवंडीकडे रवाना झाले आकर्षक बोम्मारीलू

Next Post

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ.अंजली शिंगे यांचे विशेष यश…  प्रथम क्रमांक केला प्राप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ.अंजली शिंगे यांचे विशेष यश...  प्रथम क्रमांक केला प्राप्त

ताज्या बातम्या

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

प्रहार ने केले अनोखे आंदोलन

April 11, 2026

महापौर व मनपाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802405

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697