जालना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हा परिषद जवखेडा सर्कल किंवा पंचायत समिती चिंचखेडा गणातून निवडणूक लढविण्यास तयार आहे. मी गेल्या दोन वर्षापासून (अजित दादा गट)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेसामाजिक न्याय विभाग जाफ्राबाद तालुका अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात जोडलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश सुनील तटकरे साहेब, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, जालना जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाअध्यक्ष प्रभाकर घेवंदे, जाफ्राबाद तालुक्याचे अध्यक्ष दत्तू अंभोरे यांच्या मार्गदर्शन खाली जवखेडा ठेंग जिह्वा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लठविण्याच्या कामास जोमाने तयारीला लागले आहे.
यासाठी काल दि. 01/11/2025 रोजी जाफराबाद येथे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका पदाधिकारी तसेच जाफराबाद तालुक्यातील मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. सर्वांच्या मते जवखेडा ठेंग जिल्हा परिषद सर्कल गटातून लता अशोक म्हस्के निवडणूक लढविण्यास जोमाने तयारीला लागले आहे. तसेच चिंचखेडा या पंचायत समिती गणनातून अशोक चंद्रभान म्हस्के(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष) राहणार हिराबळी ता. जाफ्राबाद यांनी उमेदवारी करावी असे सर्वांनी जाहीर केले.
जिल्हा परिषद सर्कल जवखेडा ठेंग गटातून लता अशोक म्हस्के व अशोक चंद्रभान म्हस्के यांना सर्व कार्येकर्ते या गणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी, प्रत्येक गावात जाऊन सर्व समाजाच्या मतदार राजांना भेटून,सांगून मतदान करून घेऊन निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील असे ठामपने सांगितले.
जिल्हा परिषद जवखेडा ठेंग सर्कल मधून लता अशोक म्हस्के व चिंचखेडा या पंचायत समिती गणनातून अशोक चंद्रभान म्हस्के(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष) यांनी या दोन्ही पैकी एक निवडणूक लढवावी म्हणून सर्वांनी माझे व माझ्या पत्नीचे सर्वांनी अभिनंदन केले. बैठकीस आलेल्या सर्व सामाजिक न्याय विभाग जाफराबाद तालुका पदाधिकारी व मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचे मी आभार मानले.


















