सोलापूर – महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रंगत वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर शहरात भाजपने वातावरण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अ) सुनिता सुनिल कामाठी, ब) अंबिका हनुमंत चौगुले, क) सत्यनारायण रामय्या गुर्रम व ड) विजय भुमय्या चिप्पा यांच्या प्रचारार्थ ढोल-ताशांच्या गजरात भव्य पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेला प्रमुख मान्यवर म्हणून शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, मोनिका कोठे, राधिका चिलका उपस्थित होत्या.
दरम्यान, पदयात्रा हॉटेल सत्यम, ७० फूट रोड भाजी मंडई, गेंट्याल चौक, संत तुकाराम चौक, बापूजी नगर परिसर, विद्यानगर, पाथरूट चौक, खड्डा चौक, अशोक चौक, पोलिस चौकी, क्रांती झोपडपट्टी, कमटम नगर, श्रीकृष्ण मंदिर, भावनाऋषी पेठ दवाखाना मार्गे जाऊन पंचमुखी मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.
भाजप उमेदवारांचा विजय निश्चित
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार उतरले असून, त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर शहरात भाजपमय वातावरण झाले आहे. शहराचा विकास करण्यासाठी भाजपला पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल. शहराचा कायापालट करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केले.
























