बार्शी – बार्शी शहर व तालुक्यातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारी बार्शी डायरी दिनदर्शिकाचे प्रकाशन श्रीधरदादा अंधारे व डॉ.पडवळ बंधू तसेच डॉ.जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते संपन्न झाले.
गेली सहा वर्षे झाले बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना,भगवंत सुपर स्पेशल हॉस्पिटल व सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाशक शाम थोरात यांनी बनवलेल्या बार्शी डायरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा श्रीधरदादा अंधारे, न्युरोसर्जन डॉ. अमित पडवळ व ऑर्थोपेडिक डॉ. सुमित पडवळ तसेच डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
बार्शी डायरी दिनदर्शिकाचे हे सहावे वर्ष असून शहर व तालुक्यातील प्रत्येक वर्तमानपत्रा (पेपर) सोबत वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यामार्फत मोफत दिली जाणारी तालुक्यातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारी एकमेव दिनदर्शिका असलेली माहिती यावेळी प्रकाशक शाम थोरात यांनी सांगितले.
बार्शी डायरी दिनदर्शिका प्रकाशनावेळी बार्शी जनता टाईमचे संपादक संतोष सूर्यवंशी, पत्रकार अरुण बळप (दैनिक सोलापूर तरुण भारत), संजय बारबोले, गणेश गोडसे, दत्तात्रय ढिगे, गणेश भोळे, बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बंटी बाबर, सचिन शेटे, ताहेर काझी, सादिक शेख, सोमनाथ गाढवे, शरद काकडे, विजय शिंगाडे, सुनील थोरात, निलेश झिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.


























