अक्कलकोट – तालुक्यातील बोरी उमरगे मिरजगी फाटा येथील जागृत श्री धानेश्वरी देवी चेट्टी आमवशा यात्रा महोत्सव निमित्य गुरुवार २० रोजी म. नी. प्र. बसवंलिंग महास्वामीजी वीरक्त मठ अक्कलकोट यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केली आसल्यांची माहिती वे. इरय्या मटपती स्वामी यांनी दिली आहे.
गुरुवार २० रोजी पहाटे श्री धानेश्वरी देवीस महारुद्रभिषेक होणार असून सकाळी ९ वा. ध्वजारोहण होणार आहे.दुपारी ११ वाजता श्री धानेश्वरी देवी पालखी व पुरंवत मिरवणूक कार्यक्रम होणार आहे.दुपारी बारा नंतर सिद्धाराम मसुती यांचे कडून महाप्रसाद वाटप होणार आहे.सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमाचे आवस्य लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी वतीने करण्यात आला आहे.




















