वळसंग : श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या मैदानावर मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ दुपारी तीन तीस वाजता बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान होणार आहे कै. वि.गु.शिवदारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वि.गु.शिवदारे प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन श्री राजशेखर शिवदारे यांच्या अध्यक्षतेखाली हा व्याख्यान कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ सूत गिरणीचे संचालक सतीश ईसापुरे, नरेंद्र गंभीरे, वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे, श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, श्री शंकरलिंग स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थळंगे व सर्व संचालक गावकरी सरपंच जगदीश अंटद इत्यादींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचे लाभ सर्व माजी विद्यार्थी पालक व गावकऱ्यांनी घ्यावीत असे आव्हान वि.गु.शिवदारे प्रतिष्ठान मार्फत करण्यात येत आहे.




















