पंढरपूर – भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे २२ थर्माकोलचे तराफे महसूल प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रात पंढरपूर शहर व भुटूंबरे दरम्यान वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे २२ थर्माकोलचे तराफे मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी नष्ट केले आहेत.
या कारवाई करण्यामध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण बाळासाहेब कदम, रिंगण चव्हाण व तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, संजय खंडागळे, गणेश पिसे, किरण बाडीवाले, विराज लोटेकर, सुमित जाधव, पियुष भोसले, संदीप शिनगारे, आनंद सोनवणे, रविकिरण लोखंडे, नागनाथ खांडेकर, राहुल घुटाळ , रामदास खंदारे,गणेश तांमोर, विवेक चव्हाण, नवनाथ मोरे, अब्दुलसलीम चांदकोटे, मंगेश बनसोडे हे सहभागी होते.






















